मी पंतपरधान झालो तर ......

निबंध 
मी पंतपरधान झालो तर ......
आमचा देश छान आहे म्हणजे भारी आहे. आमच्या देशात लोकशाई आहे. त्यामुळे मी पंतप्रधान होण्याची दाट शक्यता आहे. मोदी पंतप्रधान झाल्यापासून माझ्या मित्राचा आत्मविश्वास दूणावला त्यो मला म्हणटला तू तर जाता जाता पंतपरधान हूशील ! मग मी त्याला च्या पाजलो. च्या वाला मामा हसत होता. 
आता मी बहूमतानं पंतपरधान झालोय. शपथविधीला किम ला बोलवणार. किम ला आणायला मीच जाणार. मग स्टेजवर यंट्रीला जाताना हलगी ताशा कैताळ वाजवत नेणार. 
शप्पथ कुठल्या भाषेतून घ्यायचा हा एक प्रश्नच आहे. हिंदीतन घेटलं की लोकं म्हणनार ह्यला इंग्लीश येत नही. मराठीतंन घेटलं तर म्हणनार प्रादेशिक आस्मिता जपतोय. इंग्लीश मधनं घेटलं की म्हणनार ह्यला देशाबद्दल प्रेमच नही. असे अनेक प्रश्न माझं डोस्क खात असत्यात. असो. शब्द कायबी असले तरी भावना महत्वाच्या.
आत्ता तुम्हाला प्रश्न पडेल की मी किमलाच का म्हणून बोलवलो. त्यो हिंसक वगैरे आहे. तर तुमाला सांगतो अंदाकरण दूरदृष्टीनं ह्यो निर्णय मी घेटलाय. कसं हाय माहित हाय का ? आपल्या पलिकडं कोण हाय ? चीन आणि पाकिस्तान !
चीननं परवा निषेध केला असला तरीबी आतंन दोनी बेणी एकच हायीत. चीनचंच त्यानला सपोर्ट हाय. अमेरिकला उघडं पाडायला. त्यात ही चीनवाली बारक्या डोळ्याची. आमच्यात एकरभर आत येत्यात. मग किमला रात्री बसलं की सांगायचं आम्ही तुम्हाला एवढं मानतो राव आणि ती चिन वाली आमच्यात घूसत्यात राडा करत्यात. जरा त्यानला सांगा की. असं म्हणटलं की किम बी फूगतंय. तिकडं बसल्या बैठकीलाच फोन लाव म्हणायच आणि सेटींग करायच. चीनबरोबर एकदा मैत्री झाली की पाकिस्तान बी शेपूट घालतंय. किम ला सगळं देश हिंडवायच पाचसा दिवसात फक्त पूणे सोडून. असे माझे परराश्ट धोरण असेल.
भारतात जर कोणी प्रगति घडवू ईच्छीत असेल तर सगळी भिस्त तरूणाईवर आहे याची मला जाणिव आहे. आता तरूणाना कोण घडवणार ? शिक्षक च की. म्हणून मी शिक्षकाना भरगच्च पगार देईन तसेच वेगवेगळे लाभ देईन. आत्ता माझा पेपर तुम्ही तपासत आहात. मी देशाचे भवितव्य आहे. मला जर तुम्ही चांगले मार्क दिले तर भविष्य उज्जवल हूईल. पुढे इतर प्रश्नांची उत्तरे मी माझ्यापरिनं चांगली लिहली आहेत. तुम्ही चांगले गूण देवून राष्ट्रऊभारणीच्या कार्यात आपलं अनमोल योगदान द्याव ही विनंति करतो.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कंडका पाडायला कोयता धारेचा लागतो!

हातकणंगलेत राजु शेट्टींविरोधात कोण ?

कोल्हापूरातील दोन दोस्तांच्या सरकार आणि समाजाने केलेल्या हत्या!