पोस्ट्स

जानेवारी, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सव्वी जानेवारी

सव्वीस जानेवारीला आधी सव्वी जानेवारी म्हणत होतो. प्रजासत्ताक दिन हे शाळेत म्हणटलं तर चालायचं. त्यादिवशी सगळीकडं झंडावंदन असतंय. सकाळी शाळेत गेलं की परवतफेरी असायची. त्याला प्रभातफेरी म्हणतात ते हायस्कूलला गेल्यावर कळलं. गावात सोसाटी, मध्यवर्ती बँकेवर, चावडीवर, आणि समाजमंदिरवर झंडावंदन करून शाळेत एकदा करायचं. मग गावातली काही लोकं गोळ्या, बिस्कीट ,चाकलेट , बर्फ्या जिलेब्या वाटायची. ते रांग बदलून बदलून सगळं साठवायचं आणि तूझं लै काय माझं लै ? म्हणून भांडायच. नंतर एकमेकाला वाटायच. घरला झंडा फिरवत यायचं. दिवसभर खाकि चड्डी पांढरं शर्ट आणि त्यावरचा बिल्ला काढायच नाही. सोनेरी बिल्लं आवडायची नाहीत. पॅस्टीकची मोठ्ठीच्या मोठी बिल्लं लावायची. असं करायचं.  दूपारी घरात पुरी बासुंदी नहीतर पुरणाची पोळी, फोडणी भात ते असायचं. किशना आज्जा आणि शिप्याचा केशव मामा आमच्यात कामाला येत हूतीत, ते आमच्यातंच जेवायचे, मी माझं आणि त्यंची ताटं घिवून तिथंच जावून त्यांच्याबरोबर जेवत बसायचो. किशना आज्जा गोष्टी सांगायचा. केशव तात्या पुस्तकला कव्हर घालून द्यायचा. एकदा कापडी बिल्ला शिवून कायमचं फिट्टं राहावं असं वाटलंतं,

तिनं डोक्यावरंचा पदर नाकापर्यंत खाली केला.

आज त्यची बायकू माहेरास्नं आली होती. लग्नानंतर पाच दिवस इकडं राहून परत माहेराला जावून पंधरा दिवस झालते. त्यानंतर पहिल्यांदाच तिला तो पाहत होता. ती सकाळी दहा वाजता आली. लाडूचिवडा फराळ आणि आह्यारमाह्यार घेवून. त्यानंतर दोन तास इकडेतिकडे असेच गेले. मग घरचे दोनचारजण आणि हे दोघे नवराबायको मिळून देवदर्शनाला गेले. कुलदैवत वगैरे जवळ होतं तासाच्या अंतरावर. असं दोनतीन तास गेले. कुठल्या देवाला जाईल तिथंला पुजारी उपरण्याला आणि साडीला गाठ मारायचा आणि प्रदक्षिणा माराय लावायचा. तश्या प्रदक्ष िणा झाल्या. परत सगळी घरी आली. संध्याकाळंच शेजारपाजारी लोकं घरी येवू लागली. ते येतातच. प्रत्येकजणाला फराळ देत देत हासुद्धा खात होता. गावातल्या दोस्तास्नी कळलं. हा देवाला जावून आलाय, म्हणजे आज पह्यलि रात्र. हा कलंदर कुणाचीही पह्यली रात्र सूखासूखी जावू द्यायचा नाही. फटाकड्या लावायचा, कुत्र्याचं बारकं पिल्लू निवून त्यांच्या दाराला बांधून यायचा. आज सगळी ती लोक बदला घेणार होतीच. रात्र झाली. साडेदहा वाजले. फटाकड्याची लड लागली, बायकू अजून आली नव्हती. ह्याला फोन आलीत. विचारले, काय ? आत्ता कसं वाटतंय ? हा म्हणटला, अजून कशा
बर्याच सुंदर मुली हूशार नसतात आणि त्यांना शेवटला काळा, केसं पिकलेला, टकला नवरा मिळतो. ...................................................... आता संध्याकाळला थंडी संपून जे वारं सुटतं ते कसलं भारी असतंय ! ऊधळून घ्याव वाटतंय स्वतःला.  ....................................................... ऊगंच डाळीच्या किमंती वाढल्यात्या म्हणूनंच शेतमालाला दर चांगला होता. ....................................................... बर्याच लोकांना प्रजासत्ताक दिन म्हणजे काय ते माहितंच नसतं. .................................................... अमेरिकेतली लोकं मावा खात असतील का ? ..................................................... आंब्याच्या झाडाला बहार सुटतोय आणि त्याच झाडावर कुठतर मधाचा पोळा असतंय ते काढायच आणि मध प्यायच. जब्राट टेश्ट. .................................................... फ्रान्सच्या गड्याला हिकडं ऊसाचं फड तोडायला आणलं पाहिजे. ...................................................... काही लोकं अंथरूणातसूद्धा मोबाईल घेवून झोपतात. ................................................... झोपेत परवा भाष

गोष्ट पावनेतीन हजार वर्षानंतरची

ही गोष्ट सुमारे पावनेतीन हजार वर्षानंतरची आहे. म्हणजे आपलं हे सगळं जग परत एकदा गूडूप होवून. नव्यानं आणि जीवसृष्टी वरती तयार झालेली असलं. मग ती लोकंही प्रगती करतील. त्यांनाही ईतिहास वगैरे गोष्टींचा शोध घ्यावा वाटला. मग त्यांनी उत्खनन केलं. उत्खन करत करत असताना ते कनफ्युज झाले. मानवाचे सांगाडे काही ठिकानी गावले. काही देह हे प्लॅस्टीक सर्जरी केलेले सापडले. ते बघून ते परत गोंधळले. त्यांना कळंनासं झालं की हाडं प्लॅस्टीकची असतात की काय अशा प्रश्नात ते पडले. त्यावरून त्यांच्यात मतभेद झाले.  बर्याच सांगाड्यांच्या हाती आयताकृती प्लॅस्टीक सामान गावलं. ते खरतर मोबाईल होते. काहीजण सेल्फी काढतानाच गाडले गेले होते. त्यावरून अनेक कथा त्या काळात तयार झाल्या. एका खेडेगावात उत्खनन झालं तिथं, टमरेल, पॅरेशुटच डबा, कंगवा, बुट प्लॅस्टीकंच बारडी इ सामान आढळलं.  त्यानंतर पावणेतीनहजार वर्षानंतरचे लोक आपल्या युगाला प्लॅस्टीक युग म्हणू लागले.

स्स्स हा स्स्स हा

एकटा म्हणटला, ती पोरगी काळी हाय की !  हा म्हणटला, असू दे की त्यला काय हूतंय, आत्ता मला सांग वोबामा यवढा मोट्टा गडी त्यची बायकु कसली हाय ? ................................................... साठसत्तर फूट खाणीची जी रिकामी जागा पडल्या त्यात काॅलम टाकून घरं बांधायची, जागेची अडचणच्या वेळी असं कायतर केलं पाहीजे. .................................................... रात्रीत गाडी चालवताना जोरात आणि सारखं सारखं हाॅर्न वाजवू नका. लोक वेगळं समजत्यात. ...................................................... कायपण झालं की माझ्यावरंच नाव येतंय. करून गेलं गाव आणि माझ्यावर आलं नाव  gasp emoticon .................................................... हॅन्डग्लोव्हज घालून नमस्कार केलं तर देवापर्यंत जात नही असं गुरव म्हणटला. .................................................... कधीकधी वाटतंय किमसारखं केसाचं कट मारून वारं करायचं. ................................................... दोनचं मिनटं घातलंय की नाही तोपर्यंत हार काढून ठेवतात. मन लावून काढलेली सुंदर रांगोळी पण गर्दी तूडवून पुसून जाते. त्या हारवाल्याला कि

गाव सगळं मामा आणि एक नही कामा.

ह्याला पैशाची नड पडलीती. घरातलीबी देईना झालेली. मग हा दूसर्या दिवशी यरवाळी गेला आणि वगळीच्या म्होरं ऊभा राह्यला. तिकडंनं म्हादूआण्णा टमरेल घेवून आला. काय आण्णा म्हणून पंधरा मिनटं बात्या खपलला. म्हादूआण्णाच तोंड हळूहळू बारिक होत चाललेलं बघून हा म्हणटला पंधरा दिवसात माघार देतो दोन हजार दे की.  म्हादूआण्णा जात जात म्हणटला देतो की रं.  शप्पथ देणार काय आण्णा ? हा विचारला. रामपारी खोटं बोलीन काय ?  मग आण्णा आटपून आला आणि दोन हजार दिला.  असा हा आहे. ........................................................ लांब जावून जोरात वरडलो 'शाना झालास काय ?' दूसर्या सेकंदाला मला परत तेच ऐकू आलं. प्रतिध्वनी. बराच वेळ बसून झालं. ........................................................ संकरात्रीला पूजायच्या कुळ्या असतात. पूजून झालं की रिकाम्याच असतात. त्यात द्राक्षे आणि इतर गोष्टी चवीप्रमाणे घालून, पॅक करून, पूरून टाकायचं. नंतर दोन अडीच महिन्यानं पंधरा दिवसाला एकेक काढायचं. मस्त पैकी खोकल्याच अवशेध तयार हूतंय. एंजाय करा.  smile emoticon (सणांचा वापर करून घ्या  tongue emoticon  ) ...................

आजचा धडा : वेळ वाया घालवू नये.

बुधवार पौष शुक्ल 4 आज बुधूवार आहे. वरती बुधवार लिवलं असलं तरी बुधुवार असं मी म्हणतो. उद्या ब्येसतरवार आहे. गेल्या वर्षी सहावीत असताना गुरूवार ला ब्येस्तरवार म्हणटलो तर सर म्हणटले शहाण्यासारखं वाग. काॅलरशिपच्या परिक्षेला बसलोय. घरातली म्हणत्यात आमचं पोरगं उशार हाय. शेजारची पण तसंच म्हणत्यात. शिल्पा माझ्यापेक्षा हूशार आहे. ती दूपारच्या सुट्टीत सुद्धा पुस्तक वाचत बसते. मला वाटतंय ती नाटकं करत्या. मूल्यशिक्षणचा पहिला तास होता. सर म्हणटले स्काॅलरशीपला बसल्यात तेवढेच वर्गात बसा  आणि बाकिचे खेळायला जावा. पिंट्या आणि मह्यशा लगेच बोंबलत गेलीत. मी नवनीतचे गाईड काडून वाचत बसलो. आज बुधूवार असल्याने बिगर ड्रेस यायचं असतंय. मी आज बिगर ड्रेस घालून आलोय. आवळेकर मॅडम म्हणटल्या बाळा बिगर ड्रेस नव्हे बिगर युनिफाॅर्म. पोरी कलर कपड्यातंच चांगल्या दिसतात. शाळेच्या कपड्यात बाद दिसतात. माझं अभ्यासात ध्यान नही. कधी कधी मला शाळंला घोडा लावून शेती करावी वाटते. परवा नाना अंदाला म्हणत होता, आपल्यात शिकून मोठ्ठं झाल्याशिवाय कोण पोरगीच देत नाही. तीनच्या बेलला डबा जेवलो. आप्प्याच्या घरला गेलो. येताना आवळा आणि चिच

दहावी बारावीच्या ( दिवट्या) पोरापोरींसाठी...

दहावी बारावीच्या ( दिवट्या) पोरापोरींसाठी... यादीत कुणी दहावी बारावीचं आहे असं वाटत नाही, तरीपण. आत्ता परिक्षेला खच्चून महिना किंवा त्यापेक्षा कमी वेळ राहीला आहे. वर्षभर तुमची बोंबाबोंब असते त्याची माहिती मला आहे. शेवटाला येवून आपलं कायचं अभ्यास झालं नही असं वाटल्यानं नैराश्य येतं. त्यातून पुढच्या वर्षी परत बसून परत लै जोरात अभ्यास करू असं नको ते डोस्कं आपन या काळात चालवत असता. विशेषतः बारावीचे विद्यार्थी. तर ते सगळं झ्युट आहे हे पहिल्याझूट सांगतो. कारण तुमी किती केलं तर सुधरत नाहीसा हे मला माहित आहे. बापाचा पैसा वेष्ट जातो आणि वरनं चारचौघात त्यांना जायला वाईट वाटतं. तर करायचं काय आहे ? हे फक्त लक्षात घ्या. आणि कृतीत आणा. वर्षाच्या सुरवातीला मास्तरांनी सिलॅबस लिहून देताना कुठल्या धड्याला किती मार्क आहेत ते लिहून दिलेलं असतं. तुमच्याकडे ते नसतं. हे सुद्धा माहितंय मला. वर्गातल्या एका हुशार पोराकडंन ते घ्या. लिहून काढत बसू नका झेराॅक्स मारा. यानंतर एका विषयला पास होण्यासाठी किती गुण लागतात ते बघा. म्हणजे जास्तीत जास्त चाळीस लागतात. आत्ता जे तुमच्या हातात आहेत त्या दिवसात फक्त एवढंच कराय

'सार्थक'

हा कर्ज काढून घर बांधला आणि घराला नाव दिला 'सार्थक' .................................................. सगळं करूतवर काय वाटत नाही. केल्यावरंच वाटतं 'असं का केलो ?' ................................................... 42 ते 47 वय वर्ष असलेल्या महिलांनी सूनेची स्कूटी शिकायची झाल्यास पैस मैदानात जावावं.  .................................................... तिला म्हणटलो माझं तूझ्यावर प्रेम आहे. ती म्हणटली 'जा कि हावर्या' मग मी घरला आलो आणि विषय सोडून दिला. ..................................................... चाळणे आणि गाळणे वेगवेगळं आहे. चाळणं स्थायु आणि गाळणं द्रव. ...................................................... हा म्हणटला, 'मी सिंगल झालो आणि आखंड दूनियेतल्या पोरी एंगेज झाल्या. ....................................................... नाॅर्थ कोरियाचा फोन कोड +850 आहे. (लै वांड आहेत लोक जपून बोला. Hi केलं की चौकोन तिरकोन लँग्वेजमधन reply मेसेज येतात.) ........................................................... लग्न जमत नसलेल्या मास्तरच्या घरापुढंन त्याच

मी पंतपरधान झालो तर ......

निबंध  मी पंतपरधान झालो तर ...... आमचा देश छान आहे म्हणजे भारी आहे. आमच्या देशात लोकशाई आहे. त्यामुळे मी पंतप्रधान होण्याची दाट शक्यता आहे. मोदी पंतप्रधान झाल्यापासून माझ्या मित्राचा आत्मविश्वास दूणावला त्यो मला म्हणटला तू तर जाता जाता पंतपरधान हूशील ! मग मी त्याला च्या पाजलो. च्या वाला मामा हसत होता.  आता मी बहूमतानं पंतपरधान झालोय. शपथविधीला किम ला बोलवणार. किम ला आणायला मीच जाणार. मग स्टेजवर यंट्रीला जाताना हलगी ताशा कैताळ वाजवत नेणार.  शप्पथ कुठल्या भाषेतून घ्यायचा हा एक  प्रश्नच आहे. हिंदीतन घेटलं की लोकं म्हणनार ह्यला इंग्लीश येत नही. मराठीतंन घेटलं तर म्हणनार प्रादेशिक आस्मिता जपतोय. इंग्लीश मधनं घेटलं की म्हणनार ह्यला देशाबद्दल प्रेमच नही. असे अनेक प्रश्न माझं डोस्क खात असत्यात. असो. शब्द कायबी असले तरी भावना महत्वाच्या. आत्ता तुम्हाला प्रश्न पडेल की मी किमलाच का म्हणून बोलवलो. त्यो हिंसक वगैरे आहे. तर तुमाला सांगतो अंदाकरण दूरदृष्टीनं ह्यो निर्णय मी घेटलाय. कसं हाय माहित हाय का ? आपल्या पलिकडं कोण हाय ? चीन आणि पाकिस्तान ! चीननं परवा निषेध केला असला तरीबी आतंन दोनी बेणी एकच ह

म्हणजे मी काय अजून हे.. च हाय होय ?

पाकिस्तान वर ऊसाचं चगळा टाकायचं आणि पेटवून द्यायचं असं बारकं असताना वाटत होतं.  ................................................. कोणतर दूसरीत असताना सांगिटलतं, अमेरिकेत भिकारी चारचाकीतंन हिंडतात. आत्ता खरं वाटतंय. भिकार्यांची व्याख्या व्यापक व्हायला हवी. .................................................. समूद्रातल्या पाण्याचा योग्य वापर करायला हवं. .................................................. पृथ्वी गोल हाय, मग काय करायचं माहित हाय का ? सहजच परवा वाटलं. मग मी परवा वर्ल्ड मॅप काढून बघितलो. मधोमध आफ्रिका खंड येतंय. तिथं जायाचं आणि डबरा पाडायचं लै म्हणजे लै खोल पाडायचं एकदा तर आरपार हूईल असं म्हणजे दूसर्या बाजूला जायाचं झालं की त्या डबर्यातंन जायचं. परवा एवढं रमून गेलो या खड्डा पाडायच्या विचारात आखंड रात्र झोपंच लागलं नही. खरं तर आफ्रिका वाल्यासनी हे कळायला हवं. ..................................................... किशोरी आमोनकर रडकं गाणं गात्या. तिच्यापेक्षा बेगम परवीन सुलतानाला ऐका नुस्तं ऊचलून फेकत्या. वा वा ! करशीला. मी गेलो दोनवेळला आणि संगीताचा तास बंद पडला आत्ता विठ्याकडंन

तिथं कुणीच नसतं

ती तालुक्याच्या पार त्याकडच्या एका खेड्यातून आली होती हे तसं कुणालाच न पटण्यासारख होतं. जीन्स टाॅप, पंजाबी कायबी घातली तर भारीच दिसायची. शुद्ध बोलायची. शुद्ध बोलणे म्हणजे अधेमधे इंग्लीश बोलणे वगैरे बोलायची. फुल्ल हायटेड होती. एकंदरीत चैनीखोर प्रकारातली.  हा गडी दोन वर्ष बारावीनंतर गॅप टाकून काॅलेज ज्वाईन केलता. त्यात पण बोंब अशी की हा सकाळपारी यायचा नुस्तं डाव टाकायचा आणि निघून जायचा. लैच तट मारला तर कट्ट्यावर. अशातंच पहिलं वर्ष गेलं. कायतर करून दूसर्या वर्षात एटीकेटीनं आलता.  आता सेकंड ईयर म्हणटलं की जरा पद्दशीर यायला पायजे अस त्याला वाटलं. प्रेझेंटी शिटवर नाव तर हाय का बघूया म्हणून एक रोज पहिल्या दिवशी आला ह्यो गडी. तर क्लासरूम मध्ये एफ.वायच लेक्चर चालू हुतं. बाहेर एसवायची पोरं पोरी थांबलीती, तेवढ्यात एफवायच लेक्चर सुटलं लॅब मधून पोरंपोरी रमतगमत बहीर यायलती,  आत्तरंहिच्या ! ही आली बाहेर एक ढोली आणि एक नरफूडी पोरगी तिच्यासोबत होती. त्या याला दिसेनाश्या झाल्या ही एकटीच दिसाली. पिच्चर बघताना साईडएक्ट्रेस चांगली असली तरी बघतो कोण .? तसं आखंड एसवाय हिच्याकडंच बघालतं. आयलाह्यंच्या मी बघिट
तिकडंन आला, स्टेशनरी दुकानपुढं गाडी लावला आणि पानपट्टीत गेला.  ................................................... हिवाळ्यात काही गोष्टी आकुंचन पावतात. निर्जीवसुद्धा. ..................................................... रताळ किंवा मक्याची कनसं, शिजवून खाण्यापेक्षा भाजून खाव्यात. चांगलं लागतंय. .................................................. देवावर अतिश्रद्धा असल्याचं जी व्यक्ती तुमच्यापुढे दाखवते. तिच्यापासून लांब राहा. .................................................... डिसेंबर आणि जानेवारीत जास्त लोक मरतात. नैसर्गीकपणे. ......................................................... हा म्हणटला, दूनिया झुठ है ! पैसा प्यार है ! .................................................... मुंबईपुण्याला असणार्या लोकांना गावाकडंच लै लै भारी सगळं सांगतो. तो जाताना नाराज होवूनच जातो. मी खूश होतो. .......................................................... मी मुंगी असतो तर विमानातंन फुकटात हिंडलो असतो. ...................................................... अतिथंडी पडल्यावर नारळातंल पाणी गोठत असेल काय