पोस्ट्स

नोव्हेंबर, २०१५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मला कधीकधी बरं वाटतं.

एका पोरगीबरोबर बोलत होतो, दोनचार महिने भारीपैकी. ती माझ्या लांबच्या मामाच्या मुलीची मैत्रीण होती. म्हणजे त्या मुलीचं ह्या आमच्या मामाच्या घरी येणं जाणं होतं. मामा मम्मीपेक्षा मोठ्ठा तरीपण आक्का म्हणतो. एकदा तो मला भेटला आणि म्हणटला काय आमची पोरगी कशी आहे ?  मी हादरलो, भेदरलो, डोस्कं गच्च झालं. तरीपण नाटकीपणाच आव आणत कोण पोरगी ? म्हणटलं. तो म्हणटला आमची आक्का रे !  मग बरं वाटलं. नाहितर त्या मामाचं टक्कल संध्याकाळच्या सात वाजता पण आग वकणारं सुर्य वाटत होतं. .................... ......................... एक मैत्रिण माझ्यापेक्षा वयानं एकवर्ष मोठ्ठी आहे. तिचा वाटसप नंबर गावला. म्हणजे तिच मला मेसेज केली. मग मी पण सुट्टी द्यायची नहो म्हणटलो आणि रात्री बारा काय पहाटं एक काय मोबाईलात चार्जिंग संपतंय म्हणून झोपायच्या ठिकाणी स्विच बोर्डच तयार करून चॅटींग करू लागलो. महिनादोनमहिना गेल्यावर चारपाचदा भेटल्याबोलल्यावर एकदिवस चांगल चार स्क्रिनशाॅट भरतील एवढा मेसेज उर्फ प्रेमपत्र टायीप केलो. अर्धा तास वाचली आणि रिप्लाय दिली नरद्या बेक्कारा !म्हणटली. मग मी तिच्याबरोबर बोलायचंच बंद केलो. त्याच दिवशी संध्
सातवी शिकलेला माझा एक मित्र. बर्यापैकि उद्योगपति झाला. काल तो आणि मी त्याच्या आॅफिससाठी लागणार्या वस्तुंची खरेदी करायला गेलो होतो. जोरात बोलनं, बुडाखाली बुलेट, चांगल्या चांगल्या गाण्याची पार वाट लावून टाकावं असं गाण जोरात म्हणंनं. ही त्याची काहि वैशिष्ट्ये. दुकानाचं बीलं झालं 330 रूपये ह्या गड्यानं त्याला अडीचशेच दिले. तोंड वेडवाकडं करत त्यानं ती रक्कम स्विकारली, कारण ही तसंच त्याचं गोडं बोलनं. (इथंच जर एखादा शिक्षक असता तर ? किंवा कुणीही शिकलेलं) दुकानातल्या सामानाची खरेदी आ टोपल्यावर आम्ही आईस्क्रीम खायला गेलो. आईस्क्रिम च्या गाड्यावर जातो ना जातो तोपर्यंत ह्याचं राजस्थानी भय्यासोबत बोलनं चालू झालं - लै मिळवालाय गा तुम्ही ! त्या बिचार्याला बहुधा मराठी कळत नव्हती. मी सांगितलो त्याला मराठी कळतं नाही. हिंदीतनं बोल(अर्थात मला ह्येची हिंदी ऐकायची हौस पह्यल्यापास्नं) परत हा चालू झाला. लै कमाने लगे गा तूम, हमारे रांडचे वर भी नही जाते ओर दुसरे को भी नही जाते. और तूम गोड बोलके हमे घोडा लगा देते हे. तिथंली आसपासची माणसं ह्याच्यावर ईमप्रेस झाली होती. आमचं खावून झालंत ह्यानं बील विचारल ते म्हणा

फेसबुकवर असली तर

एकटं पोरगं सोबत दोन मित्रांना घेवुन विद्यापिठात गेलं होतं. निकाल घ्यायला. दुपारी बारा वाजताअर्ज केला. विद्यापिठातल्या मॅडम सरांनी सांगितलं साडेपाच वाजता रिझल्ट मिळेल. बारा ते साडेपाच तिघं जण मिळून विद्यापिठ सगळं हिंडून पालथं घातलं. मज्जा केली. साडेपाचला त्या ठिकाणी आले. पावणे सहा वाजता त्याचा रिझल्ट त्याला मिळाला. तरीपण तो त्या तिथल्या पुढच्याच खुर्च्यांवर बसून होता. बाकिच्या दोघांना काय कळंना म्हणून ते दोघे आले. झालं नव्हं काम. हे म्हणटलं झालं की.... मग चल की... थांबा जरा... मग सव्वा सहा वाजले तरी पण ते उठना तिथंन. ह्या दोघांना भलतंच टेन्शन आलं. मग साडेसहा वाजल्यावर ह्या गड्यानं खुर्ची सोडली. मग बाहेर पडू पर्यंत ह्याला त्या दोघांनी काय बोलंल नाही. ( आपन कायतर बोललो तर हे परत आत जावून बसायचं  gasp emoticon  ) बाहेर आल्यावर विचारले पाऊण तास तिथं का बसला हूतास ? असंच ! सांग की आम्हाला माहितंय प्रिथ्वी गोल हाय तुझा ईषय ख्वोल हाय ! मग हा जरासं फुगत आणि हसत सांगितला. ' तिथं पुढं एक पोरगी हूती माहित हाय का ? तीच ती लाल सँडल घातली हूती बघा, तीच नाव देवयानी हूतं' मग काय तिचं नाव घेवुन

शाकाहार आणि मांसाहार

शाकाहार आणि मांसाहाराबद्दल अनेक चर्चा चालू आहेत. वयाच्या तेराव्या वर्षापर्यंत मी शाकाहारी होतो. आहारात शाकाहार मांसाहार असली काय भानगड खरं तर नसते पोटात जातंय ते सगळं पवित्र असतंय असं माझ मत झालं. आठवीत असताना एका जवळच्या मित्राबरोबर जावून आम्लेट खाल्लं. चिमटीत उचलून ऊचलून. त्यात अति काय महान नसतं हे कळालं.  त्यानंतर अंडा आम्लेट, बुर्जी, बाईल रेगूलर झालं.  मग त्यातंच कोणत्यातरी महान माणसानं अंडी ही शाकाहारी असते असं सांगितलं, त्यामुळे माझ्या भावना दुखावल्या. एकंच अंडीचा पराक् रम नावावर होता. त्यातंच ते पण शाकाहारी. मग ईतर मांसाहारी पदार्थ शोध घेतले तर त्यात आम्हास 'मासा' बरा वाटला. म्हणजे कोंबडी, बोकाड हिकडे तिकडे बोंबलत हिंडत असतात त्यामूळे ते बादगड असा समज होता. त्याउलट मासा हा पाण्यात असतो. सूरमई ही चांगली असते असे समजून मित्रांनी खावू घातलं. मला ते प्रचंड आवडलं. म्हणावे एवढे काटे नसतात त्यात. आणि जे असतात ते काढताना मज्जा येते. (मला हे काटे काढण्याचा प्रकार भारी वाटतो.). त्यानंतर चिकन आलं. ते देखील भजी प्रमाणे असतं असे समजून खाल्लं. सूरवातीला साॅसची आर्धी बाटली लागायची ज्य

पुस्तक लिहायचा विचार

काय नुस्तीच सगळी बोंबाबोंब आहे. सकाळी उठून पुस्तक लिहायचा विचार मनात आला. तसा विचार करत असताना अंघोळ करावी की नको ? हे पण मनात आलं. आता अंघोळ केली तर आपन ग्रामिन लेखन चांगल्या पद्धतीने करू शकणार नाही. साबणाचा वास, डोक्याला लावायच्या तेलाचं वास इत्यादीमूळे आपन ग्रामिन लिहू शकणार नाही असं वाटलं. पण काही साबणं चांगली असतात ती तुम्हाला अधिक तरूण बनवितात त्यांचा विचार आला म्हणजे आपन नव्या दमाचे लेखक होइन अस वाटलं. हे सगळं असं विचार करत बसलो तर कधी पूस्तक लिहून व्हायचं असा वास्तविक  विचार ठपकला मग जीवात जीव ओतून मी गोठ्यातल्या दावणीत जावून बसलो तिथं गेल्यावर लक्षात आलं. होल्सटन फ्रिझन गाय ही परदेशातली गायीची जात आहे मग आपल्या लिखानावर त्याचा परिणाम होईल असं गाय मनात हंबरडा फोडून गेली नेहमी पालंच का चुकचुकावी ? गायीचं काय क्रेडीट आहे की नाही ? परवाच एका मेडीकल मध्ये मी झटपट पावडर ही झूरळं मुंग्या पाल इत्यादी पेस्टांची कंट्रोल करणारी पावडर आणायला गेलतो. तिथला तो दूकानदारचं भिंतीवरचं तळहाताच्या पसार्याएवढं झूरळ पकडून बाॅक्सात धरला आणि मला टाकून यायला लावला. त्यामूळे मी झटपट घेतलो नाही. आता लेख
दाणदाण पळत ते पोरगं मास्तरकडं आलं. मास्तर उठून ऊभा राहिले खूर्चीतून. एवढ्या सांच्याला का हे आलं. ते पोरगं अलिकडं हूशार व्हायलतं. मास्तरला आवडणार्यापैकी एक. मास्तर नं स्काॅलरशीपचा फाॅर्म भरला होता पोराचा. धापा बंद व्हायची वाट पाहनं मास्तरला झालं नाही. काय रे महेश ईतक्या गडबडीत काय झालं ?  शांत झालं पोरगं. तस डोळ्यातून पाणी यायला चालू झालं. 'बाबा म्हणालाय शाळा सोड आणि कारखान्यात कामाला लाग.' ह्याचा बाप बसायला असायचा तिथल्याची पोरं वर्ष दोनवर्ष झालं कामाला चालेली. शिकून काय धन प डत नही अशी धारणा झाली होती त्याच्या बा ची. महेशला आता काहिच कळत नव्हतं. बाप घरातनं बाहेर गेल्यावर हा मास्तरांकडे पळत आला होता. मास्तर म्हणाले 'तूझ्या वडीलांना समजावनं अवघड आहे, तू असं कर माझे एक मित्र आहेत ते रात्रशाळा चालवतात. मी तूझ्याबद्दल त्यांना बोलेन.' एवढं ऐकला तो आणि माघारी फिरला. मघाशी पळत आला होता आता कधीतर एक पाऊल उचलून टाकतोय....

योगा .....!!!!

गावात एकदा मराठी शाळेत योगा -प्राणायम ह्या गोष्टी तेजीत असताना एकदा ते पतंजली वाले लोक आले होते. मी सातवीला असेन. माझे सगळे दोस्त लोकांचे असे मत होते की आपन हे केलं की आपन हूशार होईन, अभ्यास चांगला होईल त्यामूळे मी बी रामपारी उठून घरातली समृद्धी प्लॅस्टीकची चटई घेऊन जात असे. अशी चटई घेऊन जाणे पण समृद्धीच लक्षन असे. त्या दगडामातीच्या ठिकाणी आपली चांगली हातरताना मला वाईट वाटत असे, पण हूशार झालो तर पैसे फिटतील असं समजून चटई पसरायची. मग त्यांच स्टेजवरचं सेटींग हूपर ्यंत चटयी वर स्वतःला पसरून घ्यायचं. सूरवात झाली की पहीला लूझनींग असायचं म्हातारे कोतारे लोक बी आधीच हलत असताना आणखी हलायचे म्हणजे एखाद्याचं मान हलत असलं तर त्यो बी आणि जरा जोर लावायचा. बायकापोरींच्या झिंज्या वेण्या पलिकडचीला बडवायच्या कधी कधी. हसायला लावायचे हॅ हॅ हॅ असं गावातले हसायचे आणि हा हा हा असं ते हसायचे मध्येच कुणाला तर हसताना खाकरायला यायचं. आलेलं मटरेल तसंच त्यो बिचारा आत ढकलायचा. हात पाय सट्रेटनींग करायला लावायचे. त्यावेळी माझी खाकि चड्डी फाटली होती. म्हणून मी दोन दिवस शाळेलाच गेलो नव्हतो. मग आलकट पलकट घालून बसायला

'तो' मेलाय.

परिस्थिती घरची जेमतेम चांगली होती. म्हणजे झाली होती. डोक्याला ताप किंवा त्रास करून घ्यायचं काही काम नव्हतं. दोन्ही पोरं हाताखाली आलेली. त्यामूळं त्यांच रूटीन लावून द्यायचं हे एक काम होतं आता. मोठ्ठा पोरगा कामावर जात होता. तो महिन्याकाठला चारपाचहजार आणायचा. बारकं पोरगं हिकडं तिकडं हिंडत होतं. ते बी थोड्या दिवसात लागील नोकरीला आणि दोघा भावांचं मिळून दहा हजार पर्यंत महिन्याला येतील. असं त्याला वाटायचं. एक दिवस मोठ्ठं पोरगं नोकरीवरून संध्याकळी पाच ला यायचं ते आलंच नाही. फोन करून बघितलं तर मोबाईल स्वीच ऑफ येत होता. संध्याकाळी एक फोन आला. तुमचं पोरगं दवाखन्यात हाय आणि या. लहान पोरग्याला घेवून हा दवाखन्यात गेला. तिथं गेल्यावर कळलं. पोराला कंपनीतल्याच माणसांनी मारल्यात. कारण होतं. हा तिथलं काही पार्ट चोरायचा आणि एका दुकानात विकायचा. चोरी उघड झाली होती. मालकानं आणि कंपनीतल्या पोरांनी मरूस्तवर मारून दवाखन्यात आणून टाकलं होतं आणि सत्तर हजार रूपये नुकसानभरपाई दिली पाहिजे नाहीतर केस घालणार. ह्यान दोन दिवसाची मुदत मागितली. बँकेत एक पावती होती पन्नास हजारची. ती मोडली आणि मेव्हण्याकडनं एक दहा हजार

एक हाॅरर स्टोरी

तूम्हाला रात्री कि नाही एक हाॅरर स्टोरी सांगतो काय.... मी पाचवीला हूतो एकदा. म्हणजे सगळे एकदाच असतात. मी पाचवी एका झटक्यात सूटलो होतो. माझा पाचवीत असताना एक मित्र होता अक्षय म्हणून. त्याचा वाढदिवस हूता. मी गेल्तो. रात्रीचं दहा वाजलं तिथंन येताना. मला नळीवरून सायकल मारता येत नसे त्याकाळात. मी मधी पाय घालून मधन सायकल मारत यायलो होतो. सायकल आणि गाडी चालवणे ऐवजी मारणे का म्हणत असतील लोक मला अजूनपर्यंत कळलं नाही. असो. तर मी सायकल मारत येत होतो. अंधारघूडूक...... त्यातंच चवथीला असता ना मी राज पिक्चर बघितला होता. आता घरं संपत आलेली. दोन्ही बाजूला ऊस होता. ऊसात रानडूक्करं असत्यात. मला खरंच भ्या वाटत होती. मी नरसोबाला नवस केल्यामूळे जन्मलो असे घरातले म्हणतात. अनेक देवांना पण नवस बोलली होती घरातल्यांनी आणि इतरांनी पण. पण त्याकाळात माझा जोर जरा नरसोबावरंच जादा होता. म्हणून मी नरसोबाच्या नावान चांगभलं अशा घोषना मनातल्या मनात देत चाललो होतो. आता पुढं एक पडकी विहीर म्हणून प्रसिद्ध होती त्यात पडून चारपाच बायका मेल्या होत्या. त्या विहीरीजवळनं जाताना मला दूसरं काय म्हणजे कायचं आठवायचं नही. भूत लमान्याच

नविन मास्तर

आज लेक्चरला नविन मास्तर येणार होते. पोरं पोरी क्लासमधली हारखलेली काहीजण नविन काय शिकवणार तो ? असा विचार करत असतील. तीन ते पाच असं दोन तासाचं लेक्चर होतं. विषय ईतिहास होता. दोनचार पोरं आणि चौदा पंधरा पोरी.  तीन वाजायला पाच मिनटं कमी असताना ते सर आले. नविन होते म्हणजे अलिकडंच पोस्ट ग्रॅज्युएशन झालं होतं. इनशर्ट वगैरे केला होता. काय मनात आलं कोणास ठाऊक त्यांच्या ? परत बाहेर गेले आणि पाच मिनटानं आले. त्यावेळी केस व्यवस्थित भांग पाडलेले होते. सरांनी खडू उचलला आणि फळ्यावर लिहलं 'ईत िहास'. अतिबारिक अक्षरात. नविन म्हणजे तसं होणारंच की. पोरं पोरी पण डिग्रीवाली त्यामूळ जाणिव असायचीच त्यांनाही. तर सर आता बोलायला चालू केले. मध्येच ते पोरींच्याकडं बघत. आणि पुढंच सगळं विसरत मग कुठतरं बाटलीतलं पाणी पीत ते आठवायचं. तर कधी रूमालानं घाम पुसतं. आणि तेवढ्यातंच चटका मारायचे. पण एका पोरीकडं बघताना त्यांचे डोळे ह्यकने व्हायचे आणि बोलताना चरफडायचे. ईतिहासात एका गोष्टीमूळ अनेक परिणाम व्हायचे. म्हणजे आता पण होतात खरं. पण मास्तर त्या पोरीकडं बघताना काय आठवायचं नही म्हणून 'परिणामी' असं जोरात म्हण

ग्रॅव्हिटी

त्याच्या गावात समुद्र किनारा नाही. म्हणून त्यानं वातावरण निर्मीतीसाठी 140 ग्रॅम मीठ सुमारे 8 लीटर पाण्यात विरघळवून ते एका टबमध्ये भरलंय. खूर्चीवर बसून तो त्याचे दोन्ही पाय त्या टबात बूडवून खूप काही विचार करत बसला आहे.  पोर्णिमेला भरती येते पण टबमध्ये फारसा काही फरक पडत नाही. ग्रॅव्हिटी कमी होऊन पाय आपलेआपन वर येत आहेत असं त्याला जाणवत आहे.  ग्रीस ला साडे तेरा हजार किलोमिटरपेक्षा जास्त लांबीचा समूद्रकिनारा आहे. तरी तिथं गोव्यासारखं काहितरी उद्योग राबवून तिथल्या नाणेनिधीच्या प् रतिनिधी देशांच्या प्रमूखाना तसेच जर्मनीच्या जोखमा ला बीचवर एखांद दूसरी पार्टी या विकेंडला दिली तर ? ते खूष होतील. जर्मनीवाल्याला गंडवून काय केलं नाही असं प्रामाणिकपणे सांगितलं तर ? पाऊस गायब झालाय त्यामूळे दूष्काळाची परिस्थिती भारतात आहे. एका लिटरमध्ये 35 ग्रॅम मीठ असतंय. बर भारताछी लोकसंख्या जास्त आहे म्हणून 40 ग्रॅम धरू... ते मिठ काढून तेच पाणी शेताला वापरलं तर ? फडणवीसांना सांगावं की पवारसाहेबांना ? पवारसाहेबांना नको फडणवीसांनाच सांगूया त्यांनीच गोवंश हत्या बंदीचा कायदा आणला. गोमुत्र आणि समुद्राचं साॅल्टमायन्स

bahubali review

कुठलं हाॅलिवूड आणि बाॅलिवूड घिवून बसलायस मर्दा बवूबल्ली बघून ये एकदा ! आग्गायाया कसलं डोंगार चढतंय. धा बारावेळा वरनं पडलं खरं अजाबात काय झालं नही बघ त्येला. लै वांड नट हाय ! नटी तर काय तमन्ना ला घेतल्या. चायना मोबाईल असताना तिचाच वालपेपर ठेवत हूतो मी. ती तर धनुश्य आणि बाण घिवून ह्यच्या मागं. ह्येनं पाण्यातंन जवून बिनआक्सीजनचं. टॅटू काढलं हूतं. त्यातंच आमचं दोस्त पिच्चर बघाय आलतं. म्हणजे त्येनंच माझं बी तिकीट काढलं हूतं. जाताना मला म्हणटलं कपल टॅटू घिवून जावूया म्हणून. आता ते कुठं ऊठवतंय कुणास ठौक ? गावातल्या पाचसाजनास्नी बोलावलं आणि म्हणला मी यळवाची काठी फिरवणार हाय तुमी गोल वुभं रहून दगडं मारा. पहिला दोनतीन मिनटं असलं काठी फिरवलं एक बी दगूड त्याला लागला नही. दूसरा एकटा मित्र त्याची डेअरी हाय. रोज त्यो कॅन ऊचलताना गड्याला घिवून ऊचलत होता. पिच्चर बघून आल्यावर ते शिवलिंगचं शीन बघिटल्यापासनं कॅनंच ऊचलून खांद्यावरंच घेतंय. मला येताना चरायला सोडलेला रेडा दिसला खरं मी बाजूनं आलो रे. 

म्हणून बिरबल हूशार वगैरे असतो.

तर बिरबल चतूर असतो. अकबरच्या बायकूला हे काय हे पटतंच नही. ती म्हणत्या माझा भौ बिरबलकिंदा हूशार हाय. अकबर म्हणतोय घंटा ! बायकू म्हणत्या तुमची सगळी लफडी बिरबलाला ठौक असतील म्हणून तुमी माझ्या भावाला नाकारतासा. हिला कसं समजवायचं म्हणून अकबर विचार करतंय. संध्याकळी म्हणतंय ' हे बघ बई ऊगंच लोकशयी हाय म्हणून तूझं ऐकलंच नही असं व्हायला नको, आपन उद्या काॅनटेस्ट घिवू आणि ठरवू कोण किती ख्वाल हाय ते.'  बायकू खूष हूत्या, जावून भावाला सांगत्या उद्या कानटेस्ट हाय म्हणून. रात्रभर बुद्धिमत्ते ची गणित ते सोडवून घेत्या भावाकडंन. ते बो गाफटं सगळं सोडवतंय. नावनाव भावाचं आयक्यू डेव्हलप झालेलं बघत्या. खूष हूत्यात राणीसायेब. सकाळी लवकर ऊठवून भावाकडंन प्राणायाम ते करून घेत्या. तिकडं बिरबल हिकडं तिकडं बोंबलत हिंडून राज्यकारभार ते बघून येतंय. पर्देच्या ठिकाणी दोघं येत्यात. अकबरची येंट्री हूते. मूजरा, रामराम शामशाम हूतंय. मग दोघाकडं बघून अकबर खेळाचं नियम समजवून देत्यात. मग दोघांच्या हातात चारआणे देतंय. म्हणजे शेप्रेट शेप्रेट. आणि दोघास्नी सांगतंय. चाराण्याची सूतळी घिवून यायची आणि इकडं येताना ट्रंक भरील ये

'Impossible is Nothing'

झक मारली आणि इंजनियरींग पुर्ण केलं असं त्या चौघा-पाचजणांना वाटलं. नोकरी ते बी पुण्याला ! आणि पगार सात हजारच्या वर देत नहीत. गावातली लोकं घरच्यांच्यापेक्षा जादा बोंबलाय लागलेली. घरचे पण उठता-बसता, खाता-पिता, येता-जाता काय वाट्टलं ते बोलायची. जीव नको असं वाटालंत पोरास्नी. मग ते रोजच्या बैठका घेत आणि ह्या गावच्या लोकास्नी एकदा घोडा लावूनंच गप्प बसायचं असं ठरवित असतात. रोज वेगवेगळे प्लॅन्स करत असतात. मग एकदिवशी असंच ठरवत्यात आपन एकदा तरी जगात फेमस झालं पाहिजे असं कायतर करूया असं ठरतं. त्यातलं एकटं लॅपटापवर कायतर खटकं दाबत बसलं हूतं. ते म्हणटलं 'चांद्रयान मोहिम यशस्वी झाल्या.' बाकिची म्हणाली मग काय हिथलं रान घालून तिकडं चंद्रावर तुमचा बाबा ऊस लावणार हाय काय ? मग सगळी पोरं हसत्यात. पण त्ये लॅपटाॅप घिवून बसलेलं पोरगं म्हणतंय, 'आरे आपन बी यान तयार करायचं आणि एकदा चंद्रावर जावून यायचं.' दूसरा म्हणाला, 'तुमचा बा परवानकी देणार हाय काय ? आणि यान काय तुमचा आज्जा तयार करणार ?' 'तुमच्या प्रत्येकात एक इंजनेर दडलाय. आणि यान सोडणारी सगळी इंजनेर असत्यात, आपन पण यान तयार कराय

मेथीचा नवरा मेथा

मेथीची भाजी छान असते. त्यातले तांदुळ पण भाजी बरोबर शिजतात. मेथीचा नवरा मेथा असतो तो कडवट लागतोय. एकेक हुशार बायका भाजीवाल्याला विचारतात कि मेथा आहे की मेथी ? पंधरावर्षापुर्वी आमच्या एका लांबच्या मामाचं लग्न होतं. तो नाव घेतला भाजीत भाजी मेथीची शुभांगी माझी प्रितीची ! मला मेथीची भाजी खाताना हे कायम आठवतं. मग बदल्यात त्याच्या बायकोने मेथा चा आदर का राखला नसेल ? असे प्रश्न छळत असतात. पण मेथ्याला रायमिंग शब्द नाही आहे. म्हणजे ते नाव देखील बेचव वाटतं. तरीपण मी कधीतर मेथ्यावर अन्य ाय नको म्हणून एखादं नाव सुरात जुळवायचा प्रयत्न करतो पण ते काही वेगळंच होतं. ' भाजीत कडवा आमचा मेथा, अगोदरचा याच्यापेक्षा बरा होता' पण हे मान्यतापुर्वक नाव नाही अशा मुळे लग्न व्हायच्या वाटणीचं मोडायच्याच जास्त शक्यता. पण त्या लग्नात जिलेबी होती. मग ह्याला मेथीच का आठवावी, मठ्ठा होता, कोशिंबीर पण होती. पण ह्ये गडी भर लग्नात मेथी शिजवले. आणि त्यांच्यामुळं माझ्या डोक्यात असलं काहीतरी शिजत असतं. म्हणजे लग्नाच्या आदल्या दिवशी नावं वगैरे पाठ करणं महत्वाचं असावं. त्यापेक्षा पत्नीच नाव लक्षात ठेवनं महत्वाचं  grin e

पंढरपूर

सकाळी पहील्या यष्टीनं पंढरपूरला गेलतो, आत्ता आलो. असं कुठतर जायच झालं तर घरात मोबाईल घेवून जावू देत नाहीत, मी भलतीच काम करतो अशी शंका घरातल्याना असते.  सोलापूर जिल्ह्यात आवंदा पाऊस चांगला झालाय आमच्यापेक्षा, ज्वारी कंबरबरोबर आल्या, डाळींब आणि द्राक्षे बागं कमी झाल्यात, द्राक्षे कमी झाल्यात याचा अर्थ लोक शहाणे व्हायलेत.  एस.टी त मज्जा येतेच. सकाळी एकटा तिरसट काका आला मागच्या शिटावर बसला, माझाच पेपर वाचायला घेतला, प्रत्येक बातमीवर कमेंट द्यायला लागला गडी. धूडकूस घालालता नुसता. मग कुठनतर घसरत कारगील युद्ध ऊकरून काढला. आणि म्हणटला, कारगील जिंकलय तिथन सात देशावर आक्रमन करता येतंय. मी म्हणटलं काका कोणची सात देश ? काका म्हणटला तेवढं काय मला माहित असतंय काय ? यष्टीतली सगळी हसायला लागली मग काकानं माझ्या पेपराची फूकनी केली आणी एका हातानं दूसर्या हातावर बडवत बसला. सांगलीत माझ्या शिटवर एक पोरगं यिवून बसलं, ते येडशीला सोलापूर जिल्ह्यात शिकायला हाय. सांगलीस्नं सोलापूरला. त्यांचा बाबा पुण्याला असतात. मग तो म्हणटला माझा अभ्यास होत नाही म्हणून मी तेवढ्या लांब हाॅस्टेलला गेलोय. मग माझं सगळ विचारून घेतल

पुढंच पुढं 2

काल रम्या कडन आणलेला शर्ट इस्त्री केला. नीट इन्शर्ट केला. रोज हापिसात साडेदहाला जायचं ते आज दहालाच गेला. ती पण बरोबर टायमावरंच आलती. सॅक ठेवलीत दोघंबी आणि जवळच्या कॅफे मध्ये गेलीत. ह्यो म्हणला तुमच्या बा नं स्वारी पप्पांनी कशाला बोलवल्यात मला ? ती : मी सांगितलो पप्पांना तुझ्याबद्दल ! मग पप्पा म्हणटले त्याला बोलवं उद्या. तुला सांगितलं होतं काल फोन करून, तस्सा माझा हिरो आज तयार होवून आलाय. असं म्हणली आणि काच्चदिशी डोळा मारली. हे तंतरलं हुतं तरीबी हसला.  तेवढ्यात कोल्ड काॅफी आली. दोघांनी उचलंल. ह्यनं स्ट्राॅनंच चाॅकलेटी दिल तोडलं. सुरसुर दोघंबी वढलीत. ह्यनं पैशे टेकवलं. परत हापीसात गेलीत. CAआला हुता. गुडमार्निंग ते केलीत. दिवसभर काय काय करायचं ते त्यनं सांगिटलं. दोघं बी आपापल्या जागी गेली. कामाला सूरवात केलीत. तासादीडतासानं ह्यचं डोस्कं काहीच काम देईना झाल्तं, ऊठला आणि तिच्याकडं गेला. ती म्हणटली आता काय ?  अगं बाई मला मघासपस्नं एक प्रश्न लै डोकं खातोय काय सुधरना झालय. तुझ्या पप्पांना मी काय म्हणु ? काका म्हणटलं की माझी बोंब आणि मामा म्हणटलं की तूझी बोंब ! नेमकं काय म्हणु ? हीनं ढेच्याकतल

पुढंच पुढं 1

ह्ये बी.काॅम केलतं. एका C.A च्या हाताखाली काम करत हूतं. तिथंच एक पोरगी पण येत हूती कामाला. मग सगळं हिशेब करता करता ह्यांचा बी हिशेब जुळला. हे बेनं मुलखाचं उडाटप्पू हुतं. गावात ह्यला कोण शिवा देणार नही ते त्या गावचं नसणारंच. गाडीवरनं गेलं की मागं म्हणायची गेलं बघ बेणं बा च्या जीवावर डबा घिवून !  मग निबार व्हायलतं म्हणून बाबा म्हणला दोन वर्षात लगीन लावून टाकू या. पाव्हण्यात काय पोरी कमी नहीत तु बाॅट करून दाखव नुस्तं ! हे म्हणलं बाबा माझं झंगाट हाय. तिच्याबरोबरंच करणार. जात बित  जुळत हुती त्यनं बाबा काय आडव तिडवं नही बोल्ला. तिकडं पोरगीचा बाप वकील. ही सगळ्यात बारकी त्यनं हीच बी घरात अप्रम लाड ! ती म्हणलं ते सगळं मिळत हुतं तिला. मग असंच एका सन्डेला ही दोघं गेली पिच्चरला. कार्नर सिटवर एकमेकाला पाॅप कार्न भरवत बसली हूती. त्यातंच ईमोशनल सीन. ती ह्यच्या खांद्यावर मान टाकली हात घट्ट धरली. ह्ये पण ईमोशनल झाल्याचं नाटक केलं. कानावर बसलेली माशी तंद्रीत झटकावी तसं तीच टक्कूरं थोपटलं. बारिक आवाजात लग्नाचा ईषय काढला. ती पण हं हं करत ऐकाली. जरा भडकणार असं दिसली की हा पेप्सीचा स्ट्रा तिच्याकडं करायचा.

शोध

एका देवळाच्या एका पायरीवर एक भिकारी बसला होता. त्याच्या जर्मनच्या ताटलीत दोन आठ आठ आण्यांचे क्वाईन होते. तिथून दोघे जन जात होते त्यातला एकटा म्हणाला तो आंधळा भिकारी आहे.  दूसरा लगेच म्हणटला तु तो आंधळा असल्याचा शोध कशावरून लावलास ?  अरे त्याच्या डोळ्यांचा आकार बघ. त्याचे ते जागोजाग फाटलेले कपडे बघ, त्याचा कळकट चेहरा बघ. कुणाही माणसाला इतकं अस्वच्छ राहायला आवडेल तरी काय ? आवडायला काय झालं ? जर त्यानं स्वच्छ राहीलं, छानछान पोशाख घातला तर त्याला भिक कोण देणार ?  बरं तु म्हणतोयस  तो आंधळा नाही. तु कशावरून हा शोध लावलास ? त्याच्या ताटलीतले ते दोन क्वाइन बघ. ते आज व्यवहारात काहीच उपयोगाचे नाहीत. हे त्याला पक्कं माहिताय. त्यामूळेच तो निर्धास्त आहे. फक्त तुझ्यासारखे काही लोक त्याला आंधळा म्हणतात. तुझही मी खरं माननार नाही कि माझंही तु ! त्यापेक्षा आपन असं करू आपन इथून कुठेतरी लांब बसून त्याच्यावर लक्ष ठेवू. . दोघांचा होकार मिळाला. ते दोघे लांब एका कट्ट्यावर बसून निरीक्षण करू लागले. देवाला आलेल्या लोकांपैकी काहींनी भिकार्याला खायला दिलं. काहींनी चिल्लर पैसे टाकले. तो केळं, लाडू, शिरा इ चाचपून ख
नारळीच्या झाडांच्या रट्यांचा आवाज सळसळत होता. रात्रीच्या नवाच्या सुमारला वश्या काकूबरोबर शेतात बसला होता. काकू शिवच्या दगडाला टेकणी लावून बसली होती, घराकडंन काकूसाठी आणलेला चहा आणि पव्हं काकूला देऊन बॅटरी हाणत लांब रानात अंगावर वारं झेलत गेला.मधनंच कुठतरी एखाददुसरी टिटवी टिवटिवत होती त्या वार्यात पण तिचा आवाज घुमत होता. वार्यात असंच धा वीस मिनटं असंच हिंडला. एक निळंबीची चवाटी घेवून सप सप आवाज करत फिरवत आला, काकू पव्हं खाल्लीती, चहा वाटीत वतून घेतली, थोडं राहिलंत, 'वश्या एवढं घे रे मुला' म्हणटली. वश्यानं हातातली चिवाटी फिरवत फिरवत फेकली अंधारात गुणाकार करत ती चिपाटी कुठतंर लुप्त झाली. वश्या खाली बसला, तंगड्या गळ्यात घेतल्यागत केला आणि किटलीला दातं लावून चहा प्यायला लागला. चहा चार घोटात संपला. आता सोयाबीनाची मळणी झाकायची आणि घरला जायचं होतं. आजीनं कळशीतंल्या पाण्यानं वाटी आणि किटली मुगळली किटलीत पाणी घालून दोनचारवेळा फिरवली आणि पाणी त्याच रेषेत वतली. काकू नं तंबाखुची पुडी काढली आणि चूना लावून मळली आणि तोंडात पकाणा टाकला. वश्या मातीत बोटं घालून गवताच्या गड्याला हात घालत एकेक उपस

रिप्लाय

खुप दिवसातून तिचा मेसेज आला. Hi... एका ग्रुपवर हा चॅटींग करत होता. भरभर येणार्या मेसेजमुळे व्हायब्रेट मोडमुळे मोबाईल खरखर वाजत होता.  तिचा आलेला मेसेज पाहून क्षणाची ही ऊसंत न घेता मोबाईल म्युट केला, आणि तिला hello आणि चार स्मायल्या असा रिप्लाय टाकला.  आणि बसला वाट बघत, कधी तिचा रिप्लाय येतो असं वाटायला लागलं.  दोन मिनटानंतर ब्लु टीक आली, मेसेज सीन झाला पण रिप्लाय नाही आला. दोनाची पाच मिनीट झाली, परत मेसेज केला तर तिला वाटेल की हा भलताच माझ्या मागे लागलाय. असा विचार करून शांत बसला. बैचेन झाला होता. तिचं स्टेटस काय आहे ते तरी बघु म्हणून तिच्या प्रोफाईल वर डोकावला, दोन खाली तोंड घातलेल्या रडक्या स्मायल्या होत्या, निमित्त सापडलं. परत मेसेज टाकला, स्टेटस असं का ? दोन मिनीट परत गेली, त्यात तो विचार करायला लागला, ही का दुःखी असेल ? कदाचित तिच्या बी.एफ चं आणि तिच काहीतरी खटकलं असेल. हिला जरा बघितलं पाहीजे. रिप्लाय आला. डीपी लावायला फोटो नाही म्हणून कसतर वाटतंय.... विथ चार डोळ्यातून पाणी येणार्या हसणार्या स्मायल्या. ह्यान परत रिप्लाय दिला. Ohhh..... आणि झटकनं यु.सी ब्राऊझरवरून गुगल वर गेला. ति

लहान असताना

मी लहान असताना पाटीवर अभ्यासा व्यतिरिक्त काहीच लेखन करत नव्हतो, एकदा तसा प्रयत्न केला. पाटीवर 'व्हयमालीच्या' अशी जोडाक्षरयुक्त शिवी लिहली होती, ती शिवी मी सागर्याच्या पाटीवर लिवून त्याला उरपाट्या साईडने पाटी दिली, त्यानं ज्यावेळी पाटी बघितली, त्यो भडकला, त्यावेळी शांत त्वांड करून थांब तुझ बयीला नाव सांगतो म्हणटला आणि डिंब सागर्याने पाटी घाटगे बयीला दावली, त्यावेळी घाटगे बाई भडकून मला त्याच पाटीची कडं तुटस्तुकर मारलं. मला सागर्याची पाटी फूटली याचा आनंद झाल्ता. माझी पाटी शाबूत  होती. त्यादिवसापास्न घरात येवून रात्री अकरापर्यंत अभ्यास करायचो. आज्जास्नी नाव सांगितलं तर माझं आवघड हूतं, म्हणून मी अभ्यास करताना जोरात वाचायचो. अभ्यासाव्यतिरिक्त लेखनावरनं माझं मन उठलं हुतं, तरी मला निबंध लिहायला आवडायचं. ............................................. लहान असताना रात्री मी अंगणात शेंगा, वल्ली सांडगं, डाळ आणि गुळ खात बसायचो. वरती ढगात बघायचो आणि आपल्या हद्दीत किती चांदण्या हायीत ते बघायचो. पुर्ण तळापास्नं ढगापर्यंत आपलंच सगळ हाय असं समजायचो, आमच्याच हाद्दीतनं हि विमानं जात्यात असं वाटायचं

शेरलाॅक होम्स

रानातनं हात्तीगवताचा बिंडा आणून टाकलो, पुढ बघितलो तर माझा जगप्रसिद्ध मित्र शेरलाॅक होम्स ऊभा होता. मी म्हणटलो शेरल्या लै दिवसानं आलायसं.? काय करायचं तूझी आठवण आली म्हणून आलो बघ.  मी विचारलो, नविन काय लफडी ते हायीत काय नही ?  माझ्या प्रश्नाचे उत्तर न देताच मलाच प्रतिप्रश्न केला. तूझ्याकडे दोन जनावरं आहेत, पैकी एक गाय आणि दूसरं तीनचार महिन्याचं वासरू असण्याची शक्यता आहे, काय मी बरोबर बोललो.? (ह्ये बेणं पहिलापास्नंच असलं हाय, सगळ बरोबर हूडकून काढतंय, आणि मला डोस्क्याला ताप देतंय. )  मी म्हणटलो राईट ! कसं काय वळखलास ? उकिरड्याकडे बोट दाखवत म्हणाला, तिथे पडलेल्या शेणावरून ओळखलो.  बोंबला, कुणाला कशाचं आणि ह्यला उकिरड्याचं.  मग आम्ही घराकडे आलो. मी फ्रेश होऊन आलो.  घरात कोण नसल्यानं मला बरं वाटत होतं. ह्यानं आपली चिलीम काढली. मला म्हणटला, तंबाखू दे... तसं मी बापांचा पानपुडा घेतला आणि त्याच्यापुढे ठेवला. जर्दा तंबाखू घेऊन त्यानं चिलिम भरली आणि पेटवून बसला वढत.  मला म्हणटला दोन कश मार की !  मी म्हणटलो, असलं काय करायचं नाय स्मोकिंग ईज इंजूरियस टू हेल्थ ! ते म्हणटलं, खोट्टं आसतंय रे सगळं.  मी म्

दिवाळीचं बाजार

बंड्या दिवाळीचं बाजार आणायला दूकानला गेलता. सामानाची चिठ्ठी दुकानदारकडे दिली, ठराविक सामान कुठलं द्यायचं ते दुकानदारानं विचारून घेतलं, म्हणजे उदबत्ती झेड ब्लॅक, वाशेल तेल आल्मंड ड्राप्स, साबन मोती. असं. चिठ्ठीच्या वर दोन दोन उभ्या रेषा मारून त्यात मध्येच श्री असं लिवलं. मग ती चिट्टी आमल्याकडं दिली, आमल्यानं फूटाणंडाळ तोंडात टाकत टाकत एक नजर चिठ्ठीवरंन फिरवली, चिठ्ठीवर निप्पो सेल ठेवलं आणि पेनानं टिकमार्क करत एकेक वस्तू द्यायला.  बंड्या उगंचच हिकड तिकडं बघत ऊभा राहिला. तेवढ्यातंच एकटी पोरगी लेडिज सायकलवरून आली, आली ते आली पळत आली, कावंटरवर येवून पिशवी आदळली, आणि म्हणटली, काका काका,  दूकानदार पण काय बाळा असं चष्म्याच्या आतंनच डोळं मीचकत मायेने म्हणटला, नाहीतर बंड्या चिठ्ठी देताना दूकानदारानं चिठ्ठी हिसकावून घेतली होती. पुढं ती मुलगी म्हणटली काका तुम्ही मघाशी मला पिसा साखर दिली, मामीना लेसा साखर हवी होती.  दूकानदार म्हणटला, अच्छा अच्छा, आमोल हिला लेसा दे.  दूकानदारात मोठ्ठा बदल झालता, आमल्या म्हणायचं, ते आमोल म्हणटला. म्हणून काय आमल्या हारकला नही, शांत थोबाड करून बेसनपीठाच्या मेणकागदाला